Monday, 29 March 2010

प्रेम प्रेम अन् प्रेमच.......

प्रेम प्रेम अन् प्रेमच.......
गाईचे वासरावरती असते ते प्रेम.........
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम.........
आईचे मुलांवर असते ते प्रेम.........
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम.........
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच........
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच.....
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते...
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर....
खरे प्रेम असावे.....
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही....
खरे प्रेम असावे.....
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही....
खरे प्रेम असावे.....
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे.....
खरे प्रेम असावे.....
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे......
कारण.....
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही........

Monday, 22 March 2010

ह्या करता काय मराठी माणसांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती....?


"ती माती तुला विसरणार नाही...."

ईतकी मूर्खपणाची ओळ मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी ही लिहाली नाही! कारण या हुतात्म्यांची आठवण आज कुणालाही उरलेली नाही !

विंदा कर्नदीकर

हुतात्मा चौक हा संयुक्त महाराष्ट्र समिति च्या १०५ मराठी माणसांच्या आहुती चा प्रतीक आहे!

आजूनही किती मराठी लोकांच्या बलिदानचा प्रतीक आहे....,

केशवराव जेधे, आचार्या अत्रे, प्रबोधनकार टाक्रे , सेनापती बापट, शाहीर अमर हायंच्या परिश्रामाचा प्रतीक आहे!

हे सार कशासाठी? मराठी माणसा साठी तर ना? मग का आज आपण त्यांना विसरलो आहोत.....?

ह्या चळवळी संबधित माहिती .... http://en.wikipedia.org/wiki/Samyukta_Maharashtra_Samiti

Monday, 15 March 2010

गुढीपाडवा :

मराठी वर्षाचा पहिला दिवस - चैत्र शुद्ध प्रतिपदा - हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारून, दाराला तोरण बांधून, गारवा देणार्‍या, औषधी असणार्‍या कडुनिंबाची कोवळी पाने गुढीसोबत बांधून गुढीची पूजा केली जाते. नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ, नवे कोरे कापड (साडी इत्यादी), आणि गडू-तांब्या असे त्यावर बांधून सूर्योदयाला ही बांबूची काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. सूर्यास्ताला पुन्हा पूजा करुन ती उतरवतात.

नवीन वर्षाचा हा दिवस उन्हाळ्याच्या सुरुवातीचा असल्याने औषधी असा कोवळा कडूनिंब, मीठ, सैंधव, जिरे, मीरे, ओवा एकत्र वाटून थोडेसे खाण्याची प्रथा आहे. नवे निश्र्चय, चांगल्या सवयींची सुरुवात करून हा दिवस साजरा करतात. पूर्ण वर्ष उत्साहात जावे यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा समजला जातो.

सर्वरोगपरिहारक असा कडुनिंब वृक्ष असल्याचे आर्यभिषक या प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. जंतुनाशक अशा कडुनिंबाचे महत्त्व शास्त्रीय संशोधनानेही सिद्ध केले आहे. कमी पाण्यावर राहून दहा वर्षात वाढणारी ही झाडे हवा शुद्ध राखण्यासाठी महत्त्वाची आहेत. बी, साल, पाने असे पूर्ण झाड त्याच्या औषधी गुणांमुळे महत्त्वाचे आहे. वर्षातील पहिल्या दिवशी या महत्त्वाच्या झाडाची आठवण सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने करून दिली आहे.

रामायणात उल्लेख आहे त्यानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्यादिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला. म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असे म्हटले जाते. चांगली वेळ म्हणजे मुहूर्त. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त समजला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) वसंत ऋतूची सुरुवात होते. सृष्टीला नवजीवन देणारा हा ऋतू आहे. आपल्या वर्षाची गणना करताना पहिला उत्तम दिवस असेही या दिवसाला म्हटले आहे. ‘प्रतिपदा’ या शब्दाचा अपभ्रंश पाडवा झाला असावा. गुढीमध्ये वापरलेल्या प्रतिकांचा विशेष उल्लेख करायला हवा. बांबूला अनेक वेळा नवे बांबू तयार करण्याची निसर्गाने शक्ती दिली आहे, तरीही तो लवचीक असतो त्याप्रमाणे आपल्यात ताकद यावी. वस्त्र, खण हे मंगलमय वातावरण आणते, काठीवर किंवा बांबूवर धातूचा गडू किंवा तांब्या पालथा असतो. या धातूमुळे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाने येणार्‍या प्रकाशलहरी खेचून घेण्याची शक्यता वाढते असे म्हणतात.

Thursday, 11 March 2010

मित्तरांनो,

मी कोणही मोटा माणूस नाही परंतु मला अशे वाटते की जर आप्ण प्रत्येकानी आपल्या मराठी माणसाला सात देण्याचा प्रयतना जरी केला तर आज जे लोक मराठी माणसाला बॅक्वर्ड समजतात त्यांचा लक्षात याईल की मुंबई आणि महाराष्ट्रा मराठी माणसा शिवाय पुढे जाऊ शकत नाही!

मी माझे काही विचार मांडले तेसेच आपल्या सर्वांना विनंती आहे की आप्पान आपले ही विचार मांडा जयणी की मराठी माणसाला फायदाहोईल!

जे मराठी माणसे रॅशन डेप्ट., मधे काम करतात ते लोक गयर कायद्याने रष्न कार्ड बनवले जातात त्या विषयी ह्या ब्लॉग मध्ये लिहु शकता,कारण आपण त्या विषया वर अधिक जाणता!

जे मराठी माणसे आर. टी. ओ. मधे काम करतात ते लोक गयर कायद्याने ड्राइविंग लाइसेन्स बनवले जातात त्या विषयी ह्या ब्लॉग मध्येलिहु शकता, कारण आपण त्या विषया वर अधिक जाणता!

आप्ण सर्व आप आपले चांगले किव्हा वाईट अनुभव ही व्यक्त करू शकता!

विश्वास करा ह्यानी फायदा होईल....

माझी एवडीच विनंती आहे!

Followers

Blog Archive